पिंपरी (पुणे) येथे धर्मांधांकडून पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचे अपहरण !

१ कोटी रुपयांची खंडणी मागितली, पोलिसांकडून अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका !

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – विनोदे वस्ती, वाकड परिसरातील नारळ पाणी विक्रेते नसीम अख्तर, लल्लू शेख आणिसाजीम शेख यांनी पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचे अपहरण केले. अपहरण केलेल्या घरमालकाला विमानाने झारखंड येथे नेऊन गंगा नदीपात्राच्या एका बेटावर डांबून ठेवले. त्याच्या मुलाला दूरभाष करत १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी झारखंड पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करत अपहरण केलेल्या घरमालकाची सुटका केली आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून ७० सहस्र रुपये किंमतीचे ५ भ्रमणभाष हस्तगत केले. कारवाई करत असतांना नसीम आणि लल्लू शेख या २ जणांना अटक केली, तर त्यांचे ३ साथीदार गंगा नदीमध्ये उडी मारून पळून गेले. याविषयी अपहरण केलेल्या व्यक्तीच्या मुलाने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका

सर्वच ठिकाणी वाढत असलेल्या धर्मांध गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्याने त्यांची गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. पोलिसांचा धाकही संपल्याचे लक्षण आहे.