भाजप नेते राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करताना राजकुमार बडोले (निळा सदरा)

मुंबई – भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सहकार्‍यांसह २२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दिनानाथ सिंह, ‘हिंद केसरी’ पैलवान अमोल बराटे, ‘हिंद केसरी’ पैलवान अक्षय हिरगुडे, ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान अक्षय गरुड, ‘उप-महाराष्ट्र केसरी’ पैलवान युवराज वहाग, ‘उप-महाराष्ट्र केसरी’ पैलवान सागर गरुड, ‘मुंबई केसरी’ पैलवान आबा काळे, ‘पुणे महापौर केसरी’ पैलवान सोनबा काळे आदींनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.