हिंदु जनजागृती समितीकडून धनंजय देसाई यांची भेट
कोल्हापूर – आज आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे. राजकीय नेत्यांना त्यांचे विचार मांडण्याचे बंधन नाही; परंतु देशभक्त हिंदूंना कुणाला निवडून द्यावे, हे सांगायला बोलण्यास विविध बंधने आहेत. येणार्या निवडणुकीत हिंदूंनी पैसे घेऊन, तसेच अन्य आमीषांना बळी पडून त्यांचे मत विकू नये. आपण जिजामातेचे पाईक आहोत, हे हिंदूंनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांनी केले. साखरपा येथील शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु राष्ट्र सेनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. सागर कदम, संगमेश्वर तालुकाप्रमुख श्री. प्रणित दुधाने, सर्वश्री प्रकाश भोसले, युवराज काटकर, धोंडिबा पाटील, रमेश पडवळ यांसह ७०० हून अधिक जण उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी श्री. धनंजय देसाई यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणि ‘हलालमुक्त दिवाळी’चे हस्तपत्रक दिले.