विदेशातील एका साधिकेने घरी आणि तिच्या शाळेतील नोकरीच्या ठिकाणी केलेले साधनेचे प्रयत्न अन् साधनेमुळे तिला परात्पर गुरु डॉक्टरांचे जाणवत असलेले अस्तित्व

मी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ‘नामजप, आध्यात्मिक उपाय, स्वयंसूचना सत्रे आणि भाववृद्धीसाठी प्रयोग करणे’, हे सर्व प्रयत्न नियमित करत आहे. त्यामुळे आमच्या वास्तूत चैतन्य जाणवते, तसेच प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) आणि प.पू. डॉक्टर यांचे अस्तित्वही जाणवते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘ही पी.पी.टी. पाहून मला ‘संगीताच्या माध्यमातून अध्यात्मात प्रगती कशी करावी ? साधना कशी करावी ?’, यांविषयीची उत्तम आणि योग्य माहिती प्राप्त झाली.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

उपलब्ध संदर्भांनुसार श्रीरामाने ११ सहस्र ५३ वर्षे आणि श्रीकृष्णाने १२५ वर्षे कार्य केले. यांनुसार अन्य अवतारांच्या कार्यकाळाबाबत कुणाकडे माहिती उपलब्ध असल्यास त्यांनी ती कृपया सनातनला पुढील पत्त्यावर पाठवावी…

जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘रेंज’अभावी रुग्णांची गैरसोय !

जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी भ्रमणभाषद्वारे ओटीपी सेवा चालू करण्यात आली आहे; मात्र ‘रेंज’ मिळत नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याची नोंद रुग्णालय प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.

गुरुग्राम (हरियाणा) येथे गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा चांगला प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाचे तत्त्व १ सहस्र पटींनी अधिक असते. या तत्त्वाचा लाभ गणेशभक्तांना अधिकाधिक व्हावा आणि त्यांना श्री गणेशाच्या उपासनेसह विविध आध्यात्मिक..

फरिदाबाद (हरियाणा) येथे गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी येथील ‘एफ् १२५ सेक्टर १०’ येथे जिज्ञासू मीनू शर्मा यांच्या घरी ‘श्री गणेशोत्सवाचे शास्त्र’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

हिंदु देवतांचा अपमान करणार्‍या ‘फॅक्ट व्हिड’ या फेसबुक पेजच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि धर्माभिमानी अधिवक्ते यांच्याकडून तक्रार प्रविष्ट (दाखल) !

‘फॅक्ट व्हिड’ नावाच्या फेसबुक पेजवर अनेक दिवसांपासून ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हिंदु देवतांची अपमानजनक आणि अश्लील छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत.

मिरज येथे गणेशोत्सवात जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत बाळूमामा यांच्याविषयी उत्कृष्ट आध्यात्मिक देखावे !

ब्राह्मणपुरीमधील ‘श्री समर्थ चौक गणेशोत्सव मंडळा’ने श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्याचा सुंदर देखावा केला आहे.

गोव्यात मागील ४ वर्षांत चोरट्यांनी ५८ धार्मिक स्थळांना केले लक्ष्य !

गोव्यात जानेवारी २०२० ते जून २०२४ या कालावधीत मंदिरे, चर्च आणि चॅपल (लहान स्वरूपातील चर्च) मिळून एकूण ५८ धार्मिक स्थळांना लक्ष्य केले आहे आणि यामध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू मिळून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागाला कुळे-शिगाव आणि मोले पंचायत यांचा विरोध

केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागाचा मसुदा सिद्ध केला असून यामध्ये कुळे भागातील सर्व गावांचा समावेश आहे.