रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.

१. अधिवक्ता दत्तात्रय सणस (प्रमुख कार्यवाह हिंदू महासभा, महाराष्ट्र कार्यकारिणी), सातारा

अ. ‘ही पी.पी.टी. पाहून मला चांगले वाटले.’

२. सौ. वृंदा अजय मुक्तेवार (महिला शहर प्रमुख, शिवसेना), अमरावती

अ. ‘संगीत-कलेमुळे माणूस आध्यात्मिक उंची गाठू शकतो.

आ. कलेतून माणूस आत्मिक सुख प्राप्त करतो.

इ. अध्यात्म अन् संशोधन हे एकमेकांना पूरक आहेत.’

३. श्री. अनुप प्रमोद जयस्वाल (सचिव, देवस्थान सेवा समिती, विदर्भ), अमरावती

अ. ‘ही पी.पी.टी. पाहून मला ‘संगीताच्या माध्यमातून अध्यात्मात प्रगती कशी करावी ? साधना कशी करावी ?’, यांविषयीची उत्तम आणि योग्य माहिती प्राप्त झाली.

आ. ‘संगीतशास्त्राचे संशोधन होऊन सर्व लोकांना याची माहिती होणे’, ही काळाची आवश्यकता आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)