पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शीतल नेर्लेकर (वय ५५ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

काकूंना शारीरिक व्याधी असूनही त्या अत्यंत उत्साहाने आणि तळमळीने सेवारत असतात. त्या बस किंवा रिक्शा यांनी प्रवास करतात. पुण्यात नेहमी बस आणि रिक्शा यांना गर्दी असते, तरीही त्यांच्या बोलण्यातून तसे कधीच जाणवत नाही. सेवेसाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची सिद्धता असते.

कागवाड येथील श्री गणेश मंदिरात ‘श्री गणेश सहस्रनाम अभिषेक’ कार्यक्रम उत्साहात पार पडला

भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला मंदार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, श्री गणेशचतुर्थीला दीड दिवसाच्या उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना आणि ९ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम असा येथे प्रतिवर्षी उत्सव साजरा केला जातो, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी सांगितले.

श्री मंगळग्रह मंदिरात आज जन्मोत्सव सोहळा

अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव सोहळा भाद्रपद शुद्ध दशमी, अर्थात् १३ सप्टेंबर या दिवशी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

रोहा (रायगड) येथे स्फोट !

रोहा येथील ‘साधना नायट्रोकेम’ आस्थापनात सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मिथेनॉल साठवण टाकीवर वेल्डींगचे काम चालू असतांना अचानक साठवण टाकीचा स्फोट झाला.

शेळगाव (ता. इंदापूर) येथे मध्ययुगीन कालखंडातील श्री गणेशमूर्ती दुर्लक्षित !

श्री गणेशमूर्ती ही भग्न झालेल्या श्री शिव मंदिरांमध्ये आढळली आहे. या ठिकाणी श्री गणेशमूर्ती सोबत केशव रूपातील श्री विष्णुमूर्ती आहे. या श्री विष्णुमूर्तीची झीज झाली आहे. या ठिकाणी शिवपिंड, बलीदान निदर्शक वीरगळ अशा अनेक छोट्या-मोठ्या शिल्पकृती आहेत.

जनता पुराने त्रस्त; काँग्रेस खासदार रिल बनवण्यात व्यस्त !

जनतेवर संकटांचा डोंगर कोसळलेला असतांना खासदार स्टंटबाजी करत व्हिडिओ काढत असतील, तर जनतेने त्यांना निवडणुकीच्या वेळी योग्य धडा शिकवण्याची वेळ आली. काँग्रेसच्या अशा नेत्यांमुळेच ६ दशके देशाची प्रगती होऊ शकली नाही !

राज्यातील गोशाळांना १७ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वितरित !

राज्यातील गोसंवर्धन गोवंश केंद्र योजनेच्या अंतर्गत वर्ष २०२३-२४ मध्ये ३४ जिल्ह्यांतील ३२४ तालुक्यांतील पात्र १३५ गोशाळांना १७ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे भाजप आणि शिवसेना यांच्या वतीने टाळ मृदंग वाजवत आंदोलन !

येथील क्रांती चौक येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या वतीनेही आंदोलन केले. हिंदु देवतांचा अवमान होत असतांनाही शरद पवार शांत होते.

थोरल्या पवारांपासून हिंदु धर्माला धोका ! – भाजपचा गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.

राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून निषेध !

वारकरी संप्रदायात वर्षानुवर्षे ‘रामकृष्णहरि’ असा जयघोष केला जातो. राम आणि कृष्ण ही एकाच हरिची २ रूपे आहेत. प्रभु श्रीरामावर टीका करून महाराव यांनी समस्त वारकर्‍यांच्या श्रद्धेवर घाला घातला आहे.