अमळनेर – येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव सोहळा भाद्रपद शुद्ध दशमी, अर्थात् १३ सप्टेंबर या दिवशी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
श्री मंगळ देव ग्रह मंदिराला जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त परिसराला पाने, फुले आणि रांगोळ्या यांनी सजवून सर्वत्र रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरात पहाटे ५ वाजता विशेष पंचामृत अभिषेक होईल. त्यानंतर देवाला ५६ भोग अर्पण केले जातील. जन्मोत्सव सोहळा सकाळी ६ वाजता साजरा केला जाईल. या दिवशी मंदिरातील सर्व ध्वज विधीवतरित्या पालटले जातील. दुपारी १ वाजता महाभोमयागास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता महाआरती होईल. भाविकांनी सकाळी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने कळवले आहे.