१. ‘श्रीमती शीतल नेर्लेकरकाकू नेहमी हसतमुख असतात.
२. रामनाथी आश्रम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्थुलातून न पहाताही तळमळीने सेवा अन् साधना करणे
साधना चालू केल्यानंतर जवळपास १५ वर्षांहून अधिक काळ काकूंनी रामनाथी आश्रम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना स्थुलातून पाहिले नव्हते, तरीही त्यांचा गुरुदेव, तसेच रामनाथी आश्रम यांच्याप्रती पुष्कळ भाव होता. जेव्हा मला ‘काकू आतापर्यंत रामनाथी आश्रमात आल्या नाहीत’, हे समजले, तेव्हा त्यावर माझा विश्वासच बसला नाही. त्या म्हणाल्या, ‘‘मी रामनाथी आश्रम भावार्चनेत अनुभवला आहे.’’ त्या इतक्या तळमळीने आणि झोकून देऊन सेवा अन् साधना करायच्या की, ‘त्या कधी आश्रमात जाऊन आल्या नसतील’, असे मला वाटलेच नाही. ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ !’, हा अध्यात्मातील सिद्धांत काकू प्रत्यक्ष अनुभवत आहेत’, असे मला वाटले.
३. काकूंना शारीरिक व्याधी असूनही त्या अत्यंत उत्साहाने आणि तळमळीने सेवारत असतात.
४. त्या बस किंवा रिक्शा यांनी प्रवास करतात. पुण्यात नेहमी बस आणि रिक्शा यांना गर्दी असते, तरीही त्यांच्या बोलण्यातून तसे कधीच जाणवत नाही. सेवेसाठी कितीही कष्ट घेण्याची त्यांची सिद्धता असते.
– सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१३.४.२०२४)