असुरक्षित मुंबई !
मुंबई – पाकिस्तानमधून मुंबईत ‘आर्.डी.एक्स.’ येणार असल्याचा निनावी दूरभाष वाडीबंदर येथील पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आला. अस्लम अली हा कराची येथून मुंबईत ३५० किलो ‘आर्.डी.एक्स.’ घेऊन येणार आहे. महालक्ष्मी रेल्वेस्थानक, ट्रॉमा केअर सेंटर, विमानतळ, तसेच विविध रेल्वेस्थानकांवर ही स्फोटके ठेवण्यात येणार आहेत, असे दूरभाषवर कळवण्यात आले. या दूरभाषनंतर मुंबईत विविध ठिकाणी दंगल नियंत्रण पथक, शीघ्र प्रतिसाद पथक यांद्वारे पहारा वाढवला आहे. श्वानपथकाद्वारे शहरात विविध ठिकाणी शोध चालू आहे. हा निनावी दूरभाष कुणी केला ? याचा अद्यापही शोध लागलेला नाही.