‘न्यूज क्लिक’चे संपादक पुरकायस्थ यांची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप !

नवी देहली – ‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची सुटका करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी पुरकायस्थ यांच्याविरुद्ध ‘बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या (यूएपीए) विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर देहली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या अटकेच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

‘न्यूज क्लिक’ने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप आहे, तसेच चीनच्या प्रचारासाठी न्यूज क्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.