छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या कॉपी प्रकरणाची सुनावणी चालू !

  • अनुपस्थित राहिल्यास एका बाजूने निर्णय !

  • इयत्ता १० वीच्या १४६, १२ वीच्या १९१ प्रकरणांची १५ मेनंतर सुनावणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – येथील इयत्ता १० वीच्या १४६, तर इयत्ता १२ वीच्या १९१ जणांची परीक्षेतील अपप्रकार प्रकरणी सुनावणीची दुसर्‍या टप्प्यातील प्रक्रिया होणार आहे. या सुनावणीस संधी देऊनही उपस्थित न राहिल्यास एकांगी निर्णय देण्यात येणार असून निकालही राखीव ठेवला जाणार आहे. इयत्ता १० वीच्या १४६, १२ वीच्या १९१ प्रकरणांची १५ मेनंतर सुनावणी होणार आहे.

इयत्ता १० वीच्या एकूण १४६, तर इयत्ता १२ वीचे १९१ जण हे परीक्षेत अपप्रकार करत असल्याचे आढळून आले आहेत. यातील ३ जणांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पहिल्या सुनावणीत अनुपस्थित असलेल्यांना पुन्हा त्यांची बाजू मांडण्यासाठी दुसरी संधी देण्यात येते. या दोन्ही संधी देऊनही विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास तदर्थसमिती समोर बैठकीत हे प्रकरण मांडण्यात येईल. त्यावर चर्चेनंतर अनुपस्थित रहाणार्‍यांविषयी एकांगी निर्णय देण्यात येणार. शिवाय निकालही राखीव ठेवण्यात येईल. अशी एकूण इयत्ता १० वी आणि १२ वीची ३३७ प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली.