ब्रह्माकरमळी (गोवा) येथील ब्रह्मोत्सवात झालेल्या हिंदू संमेलनात ठराव
वाळपई, १९ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंच्या विरोधात कारवाया करणार्यांना आणि हिंदु धर्म न मानणार्यांना हिंदूंच्या मंदिरांत होणारे उत्सव, जत्रा, कालोत्सव यांमध्ये व्यवसाय करण्याची संधी न देण्याविषयीचा ठराव ब्रह्माकरमळी येथील ब्रह्मोत्सवात झालेल्या हिंदू संमेलनात एकमताने टाळ्यांच्या कडकडात संमत करण्यात आला. या प्रसंगी कुंडई तपोभूमीचे पीठाधीश्वर सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, देवस्थानचे अध्यक्ष सागर देसाई, उपाध्यक्ष वामनराव देसाई, सचिव महेंद्र गाडगीळ, खजिनदार सागर प्रभुदेसाई, सभासद रामराव देसाई, संजीव सावंत आणि चंदन नाईक हे उपस्थित होते. हा ठराव खडकी येथील राममंदिराचे माणिकराव राणे आणि गणपतराव राणे यांनी मांडला. त्याला सोनाळ देवस्थानचे रामराव राणे आणि म्हाऊस देवस्थानचे गावकर यांनी अनुमोदन दिले. या संमेलनाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
या वेळी सत्तरी तालुक्यातील एकूण २७ देवस्थान समित्यांचा सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
संमेलनाच्या आरंभी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांचे आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाचे दर्शन घेतले. वामनराव देसाई यांनी स्वामीजींची पाद्यपूजा केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद गाडगीळ यांनी केले आणि वामनराव देसाई यांनी आभार मानले. देवस्थान समितीच्या गौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर केळकर यांनी केले, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतमी चोर्लेकर- गावस
यांनी केले.
आजच्या तरुणपिढीसमोर हिंदु धर्म परिवर्तनाचे धोके रोखण्याचे आव्हान ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीआज हिंदु धर्मासमोर अनेक
प्रकारची आव्हाने आहेत. आपल्या आया-बहिणींना फसवून त्यांचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. आजच्या तरुणपिढीसमोर हिंदु धर्म परिवर्तनाचे धोके रोखण्याचे आव्हान आहे. यामुळे हिंदु बांधवांनी एकसंघ होणे काळाची आवश्यकता आहे. तरुणांनी अशा प्रकारच्या संघर्षाला समर्थपणे तोंड देण्याची सिद्धता ठेवणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी ब्रह्माकरमळी येथील ब्रह्मोत्सवात झालेल्या हिंदू संमेलनात केले.
सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी पुढे म्हणाले, ‘‘धर्मरक्षणासाठी आज प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी अनेक प्रकारच्या संघर्षांना तोंड देऊन आपल्या मंदिरांचे रक्षण केले. आज ही देवस्थाने सांभाळण्ो, हे आपले उत्तरदायित्व आहे. मंदिरे सांभाळत असतांनाच हिंदु धर्माचे संस्कार टिकवणे आणि आपल्या बाल पिढीवर धर्मरक्षणाचे संस्कार करणे आवश्यक आहे. यासाठी मंदिराच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मंदिरामध्ये प्रतिदिन आध्यात्मिक स्वरूपाचे कार्यक्रम, नामस्मरण होणे आवश्यक आहे. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने सत्तरी तालुक्यातील हिंदु बांधवांची एकजूट होत आहे. अशा प्रकारच्या संमेलनाच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये आत्मविश्वासाचे बीज निर्माण होते. सत्तरी तालुक्यामध्ये अशा प्रकारचे संमेलन घेण्याची माझी इच्छा होती. ब्रह्मदेवाने ती पूर्ण केली. येणार्या काळात प्रत्येक गावातील मंदिरामध्ये संस्कारवर्ग चालू करा. त्यासाठी आवश्यक असलेले साहाय्य आमच्या संप्रदायाकडून दिले जाईल. आता केवळ मौन धारण न करता हिंदूंच्या विरोधात होणार्या कारवायांना सामोरे जाण्याची शक्ती निर्माण केली पाहिजे.’’