फोंडा (गोवा) येथे हिंदू रक्षा समितीची सभा
फोंडा, १९ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जो हिंदु जागृत होत नाही, तो हिंदु नव्हे ! आज हिंदु जागा झाला नाही, तर तो पुढे कधीही होणार नाही. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘एक है तो सेफ है’ (संघटित रहाल, तर सुरक्षित रहाल) ही घोषणा फलद्रूप ठरली. हिंदू संघटित झाल्यास धर्मांध हिंदूंच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र येणे, ही काळाची आवश्यकता आहे. महिलांनी पवित्र विचारांनी कार्य करण्यास प्रारंभ केल्यास पुढे असे कार्य करणार्यांची संख्या झपाट्याने वाढत जाणार आहे. हिंदू संघटित राहिल्यास हिंदु राष्ट्र नक्कीच येईल, असे विचार माजी खासदार नवनीत राणा यांनी इंदिरा मार्केट, जुने बसस्थानक, फोंडा येथे हिंदु रक्षा समितीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत व्यक्त केले. या वेळी व्यासपिठावर हिंदू रक्षा समितीचे सुनील देसाई, विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी मोहन आमशेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. काही अपरिहार्य कारणास्तव भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेता माधवी लता या सभेला उपस्थित राहू शकल्या नाहीत.
माजी खासदार नवनीत राणा पुढे म्हणाल्या,
१. ‘‘काही जण मतांचे राजकारण करतात; मात्र आम्ही विचारांसाठी राजकारण करतो. बांगलादेशामध्ये ‘जय श्रीराम’ म्हणणार्यांवर अत्याचार केले जातात. अशा धर्मांधांना माझे आव्हान आहे की, त्यांनी १५ मिनिटांसाठी बांगलादेशाच्या सीमा खुल्या कराव्यात. हिंदू त्यांना त्यांचे बळ दाखवतील.
२. ‘हिंदुत्व हे आजारपण आहे’, असे म्हणणार्या काश्मीरच्या नेत्या मेहबूबा यांच्या कन्येला हिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानतात, हे ठाऊक नसावे.
३. ‘जय भीम’ची घोषणा देण्याचे आवाहन करणार्या काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांना आम्ही सांगू इच्छितो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. खासदार प्रियांका गांधी यांनी त्या ‘जय श्रीराम’ची घोषणा कधी देणार ? हे सांगावे. गोव्यात मुसलमानांची टक्केवारी २ वरून आता १२ टक्के झाली आहे. पूर्वी गोव्यात रहाणारे मुसलमान शांत होते; मात्र नंतर बाहेरून गोव्यात काही कट्टर मुसलमान आले. गोव्यातील ही लोकसंख्या आता परत १२ वरून २ टक्के आणायची आहे. यासाठी मी पुन्हा पुढे गोव्यात येईन.’’
..यामुळे धर्मांध वठणीवर येतील ! – नवनीत राणा
नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘फोंडा येथील सभेत गोमातेचे हत्या करणार्यांना मंदिर परिसरात व्यवसाय करण्यास अनुमती न देण्याची जी प्रतिज्ञा घेतली, ती योग्य आहे. यामुळे धर्मांध वठणीवर येण्यास साहाय्य होईल.’’
हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – मोहन आमशेकर, पदाधिकारी, विश्व हिंदु परिषद
‘बजरंग दल’ मुसलमानविरोधी नाही, तर देशद्रोही कारवाया करणार्यांच्या विरोधात आहे. आज बांगलादेशामध्ये असलेली स्थिती पुढील १० वर्षांमध्ये गोव्यात येऊ शकते. यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे काळानुसार आवश्यक आहे. हिंदूंच्या देवतांच्या हातांतही शस्त्रे आहेत, हे आपण विसरू नये. स्वसंरक्षण करण्याचा अधिकार राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे’’, असे विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी मोहन आमशेकर यांनी या वेळी केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या पूर्वी श्रीरामाचा नामजप करण्यात आला, तसेच हनुमान चालिसा म्हणण्यात आली.
२. माजी खासदार नवनीत राणा यांनी क्षात्रवृत्तीने सभेत मार्गदर्शन केले.
३. सभेच्या पूर्वी राजीव कला मंदिर ते सभेच्या स्थळापर्यंत भव्य फेरी काढण्यात आली.
गोहत्यार्यांना मंदिर परिसरात व्यवसायास अनुमती देणार नाही !
‘रोहिंग्या किंवा बांगलादेशी मुसलमान यांच्याशी आम्ही खरेदी-विक्री व्यवहार करणार नाही. गोमातेची हत्या करणारे, गोमांस खाणारे, हिंदूंची मंदिरे तोडणारे, हिंदु आई-बहिणींची अब्रू लुटणारे, हिंदु बांधवांचे ‘सर तन से जुदा’ करणारे यांना यापुढे मंदिर परिसरात व्यवसाय करण्यास अनुमती देणार नाही. अशांना आमचे घर आणि कामाचे ठिकाण येथे प्रवेश देणार नाही, तसेच अशांना घर अथवा दुकान भाडेपट्टीवर देणार नाही. अशांशी कोणताही व्यवसाय करणार नाही’, अशी प्रतिज्ञा उपस्थित हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणेने केली. फोंडा येथील हिंदु रक्षा समितीच्या सभेत विश्व हिंदु परिषदेचे गोव्याचे पदाधिकारी श्री. मोहन आमशेकर यांनी ही प्रतिज्ञा सांगितली.