सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक !- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

जर आरक्षणाचा प्रश्न मिटला असेल, तर मग कोर्टात ‘क्युरेटीव्ह पिटीशन’ (उपचारात्मक याचिका) प्रविष्ट का आहे ? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २९ जानेवारी या दिवशी उपस्थित केला आहे.

पुणे येथील जुन्या वाड्यांना ‘झोपडपट्टी’ घोषित करून पुनर्विकास केल्याचा ‘एस्.आर्.ए.’चा अहवाल दडवला !

असा चुकीचा अहवाल का दिला जातो ? त्यातून कुणाचा आर्थिक लाभ होतो ? याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे !

संपादकीय : बलशाली भारताचा अर्थसंकल्प !

अर्थसंकल्पातून ‘विनामूल्य’चे गाजर दाखवण्याऐवजी प्रत्येक नागरिक स्वावलंबी होण्यासाठी योजना आखाव्यात !

आजपासून अमळनेर येथे ९७ वे मराठी साहित्य संमेलन !

साहित्य संमेलनानिमित्त अमळनेर शहराच्या विविध मार्गांवर विविध सामाजिक संस्थांनी स्वागत कमानी उभारून साहित्यिकांचे स्वागत केले आहे.

विविध बँकांमध्ये सहस्रो कोटी रुपयांची ठेव असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका घेत आहे ५५० कोटी रुपयांचे कर्ज !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध बँकेमध्ये ५ सहस्र कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यावर ८ टक्के दराने व्याज मिळते. असे असतांनाही मोशी रुग्णालय आणि पुणे-मुंबई महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी ५५० कोटी रुपये कर्जाचे प्रस्ताव अधिकोषांतून मागवण्यात आले आहेत.

दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष !

सध्या बहुतेक सर्वच आई-वडिलांना आपल्या मुलांविषयी चिंता सतावते आणि त्यावरून ते आपल्या मुलांविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना दिसतात. अप्रसन्नता कसली ? तर मुले सांगितलेले ऐकत नाहीत, ती दिवसरात्र भ्रमणभाष …

नाशिक येथील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा !

नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेची ३ दिवसीय सहल रायगडमध्ये गड-दुर्ग पहाण्यासाठी आली होती. यात १०३ विद्यार्थी होते.

जालना येथे जाणारा गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला !

जालना येथे जाणारा एक गॅस टँकर अचानक उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढला. त्यामुळे टँकरचे २ व्हॉल्व्ह उघडले असून त्यातून गॅस गळती होत आहे. येथील सिडको बसस्थानक भागात टँकरमधून गॅस गळती होत असल्याने आणीबाणी उद्भवली आहे.

सातारा येथील ‘कस्तुरबा’ रुग्णालयासाठी आधुनिक वैद्यांची वानवा !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? जिल्हा आरोग्ययंत्रणेला जनतेची गैरसोय लक्षात येत नाही का ? यातून जनतेच्या जिवाची पर्वा प्रशासनाला किती आहे ? हे लक्षात येते !