आजपासून अमळनेर येथे ९७ वे मराठी साहित्य संमेलन !

अमळनेर – येथील सानेगुरुजी साहित्यनगरी येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून चालू होणार आहे. १ फेब्रुवारी या दिवशी बालसाहित्य संमेलन पार पडले आहे.

साहित्य संमेलनानिमित्त अमळनेर शहराच्या विविध मार्गांवर विविध सामाजिक संस्थांनी स्वागत कमानी उभारून साहित्यिकांचे स्वागत केले आहे. संमेलनाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय साहित्य महामंडळ, मराठी वाङ्मय मंडळ, प्रताप महाविद्यालय यांच्या विविध समित्यांकडून सिद्धता पूर्णत्वाकडे नेली जात आहे.

२९ जानेवारी या दिवशी आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. नंतर सुनील वाघ आणि सहकारी यांनी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा संगीत कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या आरंभी श्री सरस्वतीदेवी आणि सानेगुरुजी यांच्या प्रतिमांना हार घालण्यात आला.