सातारा, १० फेब्रुवारी (वार्ता.) – झाशीची राणी ज्या तांबे घराण्यात जन्मली, ते तांबे घराणे सातारा जिल्ह्यातील धावडशी या गावचे होय. त्यामुळे या गावात तिचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी धावडशी येथील महिलांनी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यात म्हटले आहे की, महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. वर्ष १८५७ च्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील त्या अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांचे ‘क्रांतीकारकांची स्फूर्तीदेवता’ म्हणून जनमानसामध्ये आढळ स्थान प्राप्त झाले होते. असा गौरवशाली इतिहास असलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे धावडशी या जन्मगावी भव्य स्मारक उभारण्यात यावे.
संपादकीय भूमिका :नागरिकांना अशी मागणी करावी लागणे, हे दुर्दैवी ! |