शस्त्र परवान्याची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना अतिशय गंभीर आहे. याचे राजकारण करणे योग्य नाही. किंबहुना या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्था संपली म्हणणेही योग्य नाही. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून घडला. असे असले, तरी शस्त्रे परवाने देतांना कोणती दक्षता घेतली पाहिजे, याचा विचार राज्य सरकार करेल, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले. गृहमंत्र्यांचे वक्तव्य पहाता शस्त्र परवाने देण्याविषयीची नियमावली अधिक कडक करण्याची शक्यता आहे.