श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार !

श्री. मिलिंद एकबोटे

आळंदी (जिल्हा पुणे), १० फेब्रुवारी (वार्ता.) – येथील वारकरी शिक्षण संस्थेसमोर चालू असलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रमुख श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘श्री. मिलिंद एकबोटे यांनी धर्म आणि संस्कृती जपण्याचे उल्लेखनीय कार्य आयुष्यभर केले आहे. गोरक्षण आणि सामाजिक कार्यात केलेल्या विशेष कार्याविषयी हा पुरस्कार दिला आहे’, असे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी सांगितले. या वेळी आचार्य सत्यनारायण महाराज, पू. राजेंद्रदास महाराज, योगाचार्य जाधवगुरुजी, ज्येष्ठ अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर, ह.भ.प. कोकरे महाराज, श्री भारतानंद स्वामी, गोरक्षक श्री. संजय पांडे उपस्थित होते.