अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण
मुंबई – ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या मॉरिस नोरोन्हा या गुंडाने दहिसरमधील एका कार्यक्रमाच्या वेळी गोळ्या झाडून केली. मॉरिस नोरोन्हा याचा अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा याला गुन्हे शाखेने अटक केली. मिश्राच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मिश्रा याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
अमरेंद्र मिश्रा याने न्यायालयातून बाहेर पडतांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधत मोठ्याने ओरडून सांगितले, ‘‘माझ्यावर अन्याय झाला आहे. मला फसवले गेले आहे.’’