मुंबईत गेल्या ९ वर्षांत १६ गोळीबार प्रकरणांत १७ जणांचा मृत्यू !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गेल्या ९ वर्षांत येथे गोळीबाराच्या १६ घटना घडल्या. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांकडून १० सहस्रांहून अधिकांना अग्नीशस्त्राचे परवाने देण्यात आले आहेत. मुंबईच्या इतिहासात वर्ष १९९९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ९१ व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाला होता.

१. गेल्या ९ वर्षांच्या तुलनेत मुंबईत वर्ष २०१६ मध्ये सर्वाधिक म्हणजे गोळीबाराच्या पाच घटना घडल्या होत्या. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. वर्ष २०२४ मध्ये दोन व्यक्तींचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि त्यांच्यावर गोळीबार करून स्वतःवर गोळ्या झाडणारे मॉरिस या दोघांचा मृत्यू झाला.

२. मुंबईत वर्ष २०१७ मध्ये दोन, तर २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे दोन आणि एका व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला.

३. वर्ष २०२० मध्ये मुंबईत गोळीबाराची एकही घटना घडली नाही. वर्ष २०२१ मध्ये दोन, वर्ष २०२२ मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू गोळीबारात झाला. वर्ष २०२३ मध्ये गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका :

महाराष्ट्राच्या राजधानीने गोळीबार आणि गुन्हेगारी यांत उच्चांक गाठणे लज्जास्पद !