जालना येथून मुंबईच्या दिशेने आंदोलनकर्ते मनोज जरांगे रवाना !

मनोज जरांगे म्हणाले की, आता छातीवर गोळ्या लागल्या, तरी माघार नाही. समाजासाठी मी बलीदान देण्यास सिद्ध आहे. त्या संदर्भात समाजाला विचारून निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !

श्रीराममंदिराप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेही कार्य ३ पिढ्यांचे आहे. वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ होईल. आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान भारताला प्राप्त झाल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या स्थुलातील कार्याला बळ मिळेल आणि प्रत्यक्ष स्थुलातील कार्य ५-७ वर्षांत पूर्ण होईल.

विशेष संपादकीय : रामराज्याची नांदी . . . !

धर्माचे अधिष्ठान ठेवून शत्रूला धडकी भरवणारे केलेले हिंदूसंघटन आणि धर्माचरणाने वागणारी प्रजा आदर्श हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते. रामभक्तांनी आता उपासनेची गती वाढवून राष्ट्रोत्थानाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी संघटितपणे झोकून दिले, तर रामराज्याची पहाट खरोखरच दूर नसेल !

आता रामराज्य दूर नाही !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी हिंदूंनी प्राणार्पण केले.

श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा हिंदूंचा आत्मसन्मान !

‘रामायण’ हा ऐतिहासिक ग्रंथ आहे. हिंदुस्थान सांस्कृतिक, धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी असलेला जगातील एकमेव देश होता.

श्रीराममंदिराकडून रामराज्याकडे !

५ ऑगस्ट २०२० या दिवशी एका महान कार्याला प्रारंभ झाला. अयोध्येमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिर पुनर्उभारणीचे महान कार्य चालू झाले.

नौकेतून गंगा नदी पार !

नकोस नौके परत फिरू गं, नकोस गंगे ऊर भरू ।
श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू ।

इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे !

केवळ जे घडले त्या घटना आणि प्रसंग यांचे वर्णन म्हणजे इतिहास का ? उच्चतम मूल्यांकरता सर्वस्वाचा होम करायला शिकवणार्‍या पूर्व घटनांचे जे विशदीकरण आहे तोच इतिहास ! इतिहास माणसाला भोगविन्मुख बनवून पुरुषार्थी, निरहंकारी आणि तेजस्वी बनवतो.

५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला !

३० ऑक्टोबरला सकाळी कारसेवकांनी बाबरी ढाचावर चढून भगवा फडकावला. सुमारे ५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला.

सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका येथे देत आहोत.