Pune Chicken Mutton Shops : पुणे येथे २२ जानेवारीला मटण आणि चिकन विक्री बंद !

महाराष्ट्र हिंदु खाटिक मटण व्यावसायिक महासंघाचा अभिनंदनीय निर्णय !

६ वर्षांच्या मुलीवर १२ वर्षीय मुलाकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न !

कारवाईसाठी सिंधी समाजाचा गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा !

Mumbai Ram Temple Installation BJP:श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त भाजपच्या वतीने नवी मुंबईत विविध कार्यक्रम – संदीप नाईक, जिल्हाध्यक्ष

घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका, आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

२१ जानेवारीला पंचगंगा नदीकाठी ‘श्री स्वामी समर्थ’ नामस्मरण सोहळ्याचे आयोजन !

२१ जानेवारीला पंचगंगेच्या काठावर सायंकाळी ६ वाजता ‘श्री स्वामी समर्थ’ या नामजपाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे या सोहळ्याचे ७ वे वर्ष असून प्रत्येक वर्षी ७ सहस्रांहून अधिक स्वामीभक्त त्यात सहभागी होतात.

कल्याण येथे दरोडा टाकणार्‍या ४ धर्मांधांना अटक, ३ जण पसार

लोकसंख्येत अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !

आरोपीला अटक न करता जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस निरीक्षकाने मागितली लाच !

अशा लाचखोरांना कठोर शिक्षा न झाल्यानेच त्यांचे लाच घेण्याचे धाडस होते !

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन !

२२ जानेवारी या दिवशी सकाळी रामायणकथा समाप्तीनंतर १० वाजता होम-हवन,  ११ ते ११.३० वाजता महाआरती, दुपारी १२ ते २ या वेळेत श्री प्रभुरामाच्या प्रतिमेची रथयात्रा (फळ मार्केट आणि भाजी मार्केट), दुपारी १२.३० ते ३ पर्यंत महाप्रसाद असेल.

अलिबाग येथे विश्व हिंदु परिषदेकडून ‘वाल्मिकी रामायण’ ग्रंथावर आधारित कथामालेचे आयोजन !

२४ ते २८ जानेवारी या दिवसात सायंकाळी ६ ते ९ या वेळेत श्रीराम मंदिर, ब्राह्मण आळी, अलिबाग येथे श्री वाल्मिकी रामायणाच्या कथामालांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी भिवंडी येथे मांसविक्री बंद !

अयोध्येमध्ये होणार्‍या सोहळ्यानिमित्त भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात २२ जानेवारीला मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य घोषित केले आहेत.

सनातन संस्थेचे मुंबई आणि पालघर जिल्ह्यासह देशभर ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

मुंबई आणि पालघर जिल्ह्यात हे अभियान १५ जानेवारीपासून चालू झाले आहे. मंदिरे, कार्यालये, रहिवासी संकुलामध्ये हे अभियान होत असून भाविकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.