श्रीराममंदिराकडून रामराज्याकडे !

५ ऑगस्ट २०२० या दिवशी एका महान कार्याला प्रारंभ झाला. अयोध्येमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिर पुनर्उभारणीचे महान कार्य चालू झाले.

नौकेतून गंगा नदी पार !

नकोस नौके परत फिरू गं, नकोस गंगे ऊर भरू ।
श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू ।

इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे !

केवळ जे घडले त्या घटना आणि प्रसंग यांचे वर्णन म्हणजे इतिहास का ? उच्चतम मूल्यांकरता सर्वस्वाचा होम करायला शिकवणार्‍या पूर्व घटनांचे जे विशदीकरण आहे तोच इतिहास ! इतिहास माणसाला भोगविन्मुख बनवून पुरुषार्थी, निरहंकारी आणि तेजस्वी बनवतो.

५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला !

३० ऑक्टोबरला सकाळी कारसेवकांनी बाबरी ढाचावर चढून भगवा फडकावला. सुमारे ५०० वर्षांच्या रक्तलांच्छित संघर्षाला विराम मिळाला.

सर्व हिंदु मंदिरे स्वतंत्र होतील, त्या दिवशी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

अयोध्येत उभारलेले श्रीराममंदिर आणि पुन्हा नव्याने बांधण्यात येणारी बाबरी मशीद यांविषयी पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी मांडलेली भूमिका येथे देत आहोत.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरच श्रीरामाचे मंदिर होण्यासाठी भक्तांनी केलेला त्याग !

श्री रामलला तंबूमध्ये असल्याने २३ वर्षे अविवाहित रहाणारे आणि चपला न घालणारे बिहारचे देबू दास, श्रीराममंदिर बांधेपर्यंत विवाह न करण्याची ३१ वर्षांपासून शपथ घेतलेले भोपाळ येथील भोजपाली बाबा, ३१ वर्षे मौनव्रत पाळणार्‍या धनबाद येथील सरस्वतीदेवी, ५०० वर्षे पगडी परिधान न करणारा सूर्यवंशी समाज !

सर्वार्थाने आदर्श श्रीराम !

रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने दुःख करू नका’ असे सांगितले.

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन !

कारसेवकांचे अविस्मरणीय अनुभव !

प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव ! बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?

श्रीराममंदिरासाठीच्या ४ दशकांच्या लढ्याचे श्रेय संत आणि धर्माभिमानी हिंदू यांनाच ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

वर्ष १९८३ ते वर्ष २०२३ पर्यंत विहिंपने मंदिरासाठी दिलेला लढ्याविषयी माहिती येथे देत आहे.