धर्माचरणाची आवड असलेली आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. कार्तिकी अश्विन ढाले (वय १२ वर्षे) !

आश्विन कृष्ण सप्तमी (४.११.२०२३) या दिवशी कु. कार्तिकी अश्विन ढाले हिचा बारावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि साधिका यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार (वय ९० वर्षे) यांची त्यांच्या मुलींना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

५.११.२०२३ या दिवशी फोंडा (गोवा) येथील (कै.) श्रीमती पद्मा भाटकार यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या मुलींना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात साधनेमुळे झालेले पालट, तसेच त्यांच्या शेवटच्या आजारपणात, निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे’ येथे दिली आहेत.

‘निर्विचार’ हा नामजप करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

‘मी ‘निर्विचार’ हा नामजप प्रयोगासाठी  ऐकण्यास चालू केल्यावर माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते; पण मी स्वतः तो नामजप करत असतांना माझ्या मनातील विचार पूर्ण थांबले.

नागपूर उच्च न्यायालयाने ‘अटक वॉरंट’ काढताच शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा

गेल्या ९ वर्षांपासून शिक्षकांना वेतन न देण्यातून शिक्षण सचिवांचा मनमानी कारभार दिसतो. न्यायालयाचा आदेश असतांनाही शिक्षण सचिवांनी न्यायालयात अनुपस्थित राहून न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी….

पंडित धीरेंद्र शास्त्रींना विरोध करणार्‍या अंनिसवाल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा !

हिंदु संतांना नाहक त्रास देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍या अंनिसवाल्यांचा हिंदु जनजागृती समिती जाहीर निषेध करते….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४५ प्रांतांचे पदाधिकारी भाजपच्या प्रचाराची दिशा आखणार !

लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत.

पुणे येथे ‘सावित्री सन्मान फाऊंडेशन’च्या वतीने ‘दिवाळी उत्सव २०२३ प्रदर्शन अन् विक्री’ मेळाव्याचे आयोजन !

पुणे, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘सावित्री सन्मान फाऊंडेशन’च्या वतीने ‘दिवाळी उत्सव २०२३’ या ‘प्रदर्शन अन् विक्री’ मेळाव्याचे आयोजन सिंहगड रस्ता, पुणे येथील ‘कोद्रे फार्म’ येथे करण्यात आले आहे. ३ आणि ४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या या मेळाव्याचे ३ नोव्हेंबर या दिवशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या … Read more

आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

आम्ही गाझा शहरात आधीच प्रवेश केला आहे. आता आम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे विधान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केले.

रशियाचा वॅगनर गट हिजबुल्लाला क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवणार !

इस्रायल-हमास युद्धात रशियातील वॅगनर या बंडखोर लष्करी गटाने  उडी घेतली आहे. या गटाने इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला एस्ए-२२ ही हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्याची सिद्धता दर्शवली आहे.

अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसलेल्या ९७ सहस्र भारतियांना एका वर्षात अटक केल्याचा दावा !

अशी आकडेवारी आणि त्यामागील कारण सांगून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव नसेल कशावरून ?