मॉस्को – इस्रायल-हमास युद्धात रशियातील वॅगनर या बंडखोर लष्करी गटाने उडी घेतली आहे. या गटाने इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला एस्ए-२२ ही हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्याची सिद्धता दर्शवली आहे. हिजबुल्लानेदेखील इस्रायलवर आक्रमणे चालू केली आहेत. वॅगनर गटाकडून हे शस्त्र मिळाल्यानंतर हिजबुल्लाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध आणखी वाढू शकते.
सौजन्य कृक्स