१. ‘निर्विचार’ हा नामजप करतांना मनातील विचार पूर्ण थांबणे आणि शांत वाटून कुणीतरी नामजप करवून घेत असल्याचे जाणवणे
‘मी ‘निर्विचार’ हा नामजप प्रयोगासाठी ऐकण्यास चालू केल्यावर माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते; पण मी स्वतः तो नामजप करत असतांना माझ्या मनातील विचार पूर्ण थांबले. त्या वेळी मला शांत वाटले. ‘कुणीतरी माझ्याकडून नामजप करवून घेत आहे आणि माझा नामजप आपोआप होत आहे’, असे मला जाणवले.
२. नामजपामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर झालेले लाभ
अ. ‘धान्य साठ्याची सेवा करतांना धान्याच्या गोण्या उचलणे आणि शिवणे, या अवघड सेवा देव माझ्याकडून सहज करून घेत आहे’, असे मला जाणवले.
आ. सर्व काही देव करून घेतो, यावर माझी श्रद्धा निर्माण होऊन मन निर्विचार होण्यास साहाय्य झाले.
इ. या नामजपामुळे माझ्यावरील आवरण न्यून होऊन भावजागृतीचे प्रयत्न करण्यास साहाय्य झाले.
ई. धान्य चाळतांना धान्य चाळण्याच्या यंत्रामधून मला ‘निर्विचार’ असा नाद ऐकू येत होता.’
– श्री. अभिजीत विभूते, कवळे, फोंडा, गोवा. (१९.६.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |