लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला २८ नोव्हेंबपासून प्रारंभ झाला आहे. ६५ वर्षांनंतर योगी सरकारच्या काळात विधानसभेचे अधिवेशन नव्या नियमांसह चालवले जाणार आहे. त्याअंतर्गत विधानसभा सदस्यांना सभागृहात भ्रमणभाष नेण्यास बंदी असेल. विरोधक जातीय जनगणनेसारख्या सूत्रावरून सरकारला कोंडीत पकडू शकतात.