|
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या शिक्षण विभागाने राज्यातील शाळांतील वार्षिक सुट्यांची सूची प्रसारित केली होती. यात हिंदूंच्या सणांच्या काही सुट्या रहित करून इस्लामी सणांच्या सुट्यांमध्ये वाढ करण्यात आल्याचे दिसून आले होते. यावरून सरकारवर टीका होऊ लागल्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाने म्हटले आहे की, शाळांतील सुट्यांच्या संदर्भात २ सूची प्रसारित करण्यात आल्या होत्या. एक मुसलमानांसाठी, तर दुसरी मुसलमानेतरांसाठी. प्रसारमाध्यमांमध्ये मुसलमानांसाठीच्या सूचीचेच वृत्त प्रकाशित झाले. या सूचीमध्ये त्यांच्यासाठी मुसलमानेतरांच्या सणांच्या सुट्या अल्प केलेल्या आहेत. मुसलमानेतरांसाठीच्या सूचीमध्ये असे करण्यात आलेले नाही. तेथे मुसलमानांच्या सुट्या अल्पच आहेत. थोडक्यात उर्दू शाळांसाठी सुट्यांची वेगळी सूची आणि सरकारी शाळांना सुट्यांची वेगळी सूची बनवल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
१. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडून पहिल्यांदाच अशा प्रकारे सुट्यांच्या २ सूची प्रसारित करण्यात आल्या. यापूर्वी एकच सूची प्रसारित करण्यात येत होती.
२. या सूचीनुसार मुसलमानेतरांना गुरु गोविंद सिंह जयंती, प्रजासत्ताकदिन, वसंत पंचमी, संत रविदास जयंती, शब-ए-बरात, महाशिवरात्री, बिहार दिवस, होळी, गुड फ्राइडे, ईद-उल-फितर, आंबेडकर जयंती, १ महिना दिवाळीची सुटी, जानकी नवमी, बौद्ध पौर्णिमा, ईद-उल-जोहा, कबीर जयंती, मोहरम, १५ ऑगस्ट, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नवरात्रोत्सव, दीपावली, छठपूजा, नाताळ आदींचा समावेश आहे.
३. मुसलमानांच्या शाळांसाठी महाशिवरात्री, श्रीकृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरितालिका आणि जानकी नवमी यांच्या सुट्या देण्यात आलेल्या नाहीत.
संपादकीय भूमिका
|