लंडन (इंग्लंड) – मुंबईतील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाला नुकतीच १५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्त येथील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोरईस्वामी यांनी म्हटले. ‘आतंकवादासारखे असे भयंकर कृत्य कधीही विसरू नका, त्याला क्षमा करू नका आणि असे कृत्य पुन्हा होऊ देणार नाही’, हीच आमची भूमिका आहे.’
‘Never forget, never forgive, never again’ stance on terrorism: Indian envoy to UKhttps://t.co/EpnFbDKvoe pic.twitter.com/7I6J0PuOox
— Indian Defence Forum (@defenceforum) November 29, 2023
दोरईस्वामी हे लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला युनायटेड किंगडमच्या संसदेतील काही खासदारही उपस्थित होते.