साहाय्यक पोलीस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या !
पोलिसांवरील कामाचा ताण दूर करण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार कि नाही ?
नंदुरबार येथील तत्कालीन जिल्हाधिकार्यांवर गुन्हा नोंद !
जिल्हाधिकार्यांनी शासनाची फसवणूक करणे म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार’ होय !
मृत सनदी लेखापालाच्या विवरणपत्रावर ६० कोटींचा ठेका !
मृत व्यक्तीच्या नावाने कामात भ्रष्टाचार करणार्या दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे ! यात मोठी टोळी कार्यरत आहे का ? याचीही चौकशी व्हायला हवी !
नाशिक येथे संतप्त शेतकर्यांनी अजित पवारांचा ताफा अडवला !
शेतकर्यांमध्ये असलेला सरकारी धोरणांच्या विरोधातील प्रचंड रोष दूर होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा व्यर्थ अहंकार !
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत. त्यांतील एकतरी गोष्ट शास्त्रज्ञांना बनवता आली आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतराविषयी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय परत नव्याने राखून ठेवला !
औरंगाबाद महसूल क्षेत्राचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या अंतिम निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात नव्याने आव्हान देण्यात आले आहे.