कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर घाणीचे साम्राज्य !

प्रतिकात्मक चित्र

कोपरखैरणे (नवी मुंबई) – रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात अनेक बेघर रहात असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनधिकृत झोपडपट्टीधारक तेथेच अंघोळ करणे, कपडे-भांडी धुणे असे प्रकार करतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो.

संपादकीय भूमिका :

अस्वच्छ शहरे देशाला प्रगतीपथावर कशी नेणार ?