नाशिक येथील ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’च्या घोटाळ्याचे प्रकरण
नाशिक – ‘नाशिक स्मार्ट सिटी’ प्रकल्पातीलच ८०० कॅमेर्यांचे नियंत्रण असलेल्या ६० कोटी रुपयांच्या ‘इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर’चा ठेका देतांना ‘स्मार्ट सिटी’ आस्थापनाने अपप्रकार केला आहे. या प्रकरणात २१ जुलै २०२२ या दिवशी रामदास उबाळे यांच्या नावाने ‘सीए सर्टिफिकेट’ (सनदी लेखपाल प्रमाणपत्र) सादर करण्यात आले आहे. त्यांचा सी.एम्. क्रमांक ‘१०६००३५’ असा असून उबाळे हे १८ एप्रिल २०२० या दिवशी मृत झाले आहेत. मग ‘त्यांचे विवरणपत्र कसे आले ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘ठेका देतांना त्या आस्थापनाची वार्षिक उलाढाल ३५ कोटी रुपये असावी’, ही अट डावलून जेमतेम १९ कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या ठेकेदारास काम दिल्याच्या अनेक तक्रारी नगरविकास विभागााचे मुख्य सचिव भूषण गगरानी यांच्याकडे, तसेच ‘पी.एम्.ओ.’कडे (पंतप्रधान कार्यालयाकडे) करण्यात आल्या आहेत. गगराणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी या प्रकरणी स्वतंत्र सल्लागाराच्या वतीने चौकशी केली जात असल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिका :मृत व्यक्तीच्या नावाने कामात भ्रष्टाचार करणार्या दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे ! यात मोठी टोळी कार्यरत आहे का ? याचीही चौकशी व्हायला हवी ! |