‘मेक माय ट्रिप’ आस्थापनाच्या पाकसंदर्भातील उपरोधिक विज्ञापनातून अभिनेत्री स्वरा भास्कर यांना पोटशूळ !

पाकिस्तानची फिरकी घेणार्‍या भारतीय आस्थापनाला सुनावणार्‍या स्वरा भास्कर सातत्याने भारतविरोधी कृत्ये करणार्‍या पाकिस्तानविरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

तमिळनाडूतील प्राचीन हिंदु मंदिर असलेल्या पर्वताचे ख्रिस्ती नामांतर करण्याच्या मागणीला हिंदूंचा विरोध

हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ?, हे अशा घटना सतत दाखवून देत असतात, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ?

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा

विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांकडून संघटितपणे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या.

उत्तर कोरियाकडून रशियाला १ सहस्र कंटेनर भरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांचा पुरवठा ! – अमेरिका

अमेरिका नेतृत्व करत असलेल्या ‘नाटो’ने युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रांचे साहाय्य केले. दुसरीकडे रशियावर निर्बंध लादले. या सर्वांचाच परिपाक म्हणून रशिया धोकादायक उत्तर कोरियाचे साहाय्य घेत आहे, यात काय आश्‍चर्य !

इस्रायलचा आदेश मान्य नसल्याचे सांगत तुर्कीयेचा थयथयाट !

२४ घंट्यांत गाझा रिकामा करण्याचा इस्रायलने आदेश दिल्याचे प्रकरण

कॅनडात एकाच रात्री ३ हिंदु मंदिरांमध्ये चोर्‍या !

कॅनडाच्या पोलिसांची निष्क्रीयता ! कॅनडाचे पोलीस खलिस्तान्यांवर तर कारवाई करत नाहीतच; पण चोरांनाही त्यांना पकडता येत नाही, हेच लक्षात येते !

इस्रायलच्या आक्रमणात हमासच्या वायूदलाचा कमांडर ठार

इस्रायलकडून गाझा पट्टीत हमासच्या आतंकवाद्यांवर चालू असलेल्या आक्रमणात हमासच्या वायूदलाचा कमांडर मुराद अबु मुराद ठार झाल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. हमासचे आतंकवादी जेथून हवाई कारवाया करत होते, त्याच मुख्यालयास इस्रायलने लक्ष्य केले.

मराठा समाजाला १० दिवसांत आरक्षण न मिळाल्यास पुढे होणार्‍या घटनांना सरकार उत्तरदायी असेल !

मराठा समाजाला आरक्षण द्या, ही आता शेवटची मागणी आम्ही करत आहोत. येत्या १० दिवसांत आरक्षण मिळाले नाही, तर पुढे जे काही होईल, त्याला सरकार उत्तरदायी असेल, अशी निर्वाणीची चेतावणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिली.

मुंबईत साहाय्यक पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा नोंद !

जनतेच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांवरच असे आरोप होणे गंभीर आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे !

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठातील प्रमाणपत्र घोटाळ्यात दोषींची पाठराखण !

शिवाजी विद्यापिठासारख्या नामांकित शिक्षण संस्थेमधील घोटाळा आणि चौकशी अहवालानंतरही भ्रष्टाचार्‍यांना वाचवण्याचा गंभीर प्रकार अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी राज्यपाल आणि उच्च शिक्षण विभाग यांच्या निदर्शनास आणून दिला असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.