कर्णावती (गुजरात) – येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबर या दिवशी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांकडून संघटितपणे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या. अशी घटना भारतात आणि तीही भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी प्रथमच घडली.