महिलेकडून ३ वर्षांनंतर तक्रार
मुंबई – आतंकवादविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर असतांना जानेवारी ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विश्वास पाटील यांनी वारंवार बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलेने तक्रारीत एका गुन्ह्यामध्ये साहाय्य करत असतांना विश्वास पाटील यांनी आतंकवादविरोधी पथकामध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. या कालावधीत एका हॉटेलमध्ये नेऊन पाटील यांनी गुंगीचे औषध देऊन माझ्यावर बलात्कार केला. याचे व्हिडिओ चित्रीकरण करून विश्वास पाटील यांनी माझ्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाजनतेच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांवरच असे आरोप होणे गंभीर आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे ! |