कॅनडात एकाच रात्री ३ हिंदु मंदिरांमध्ये चोर्‍या !

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या ओंटारिया प्रांतातील ३ मंदिरांमध्ये एकाच रात्री चोरी झाली. या प्रकरणी पोलीस एका संशयिताचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चोराविषयी माहिती देणार्‍याला २ सहस्र कॅनडाच्या डॉलरचे (अनुमाने १ लाख २२ सहस्र रुपये) बक्षिस घोषित केले आहे.

कॅनडा पोलिसांचे म्हणणे आहे की, ८ ऑक्टोबर या दिवशी चोर पिकरिंग येथील बेली स्ट्रीट भागातील मंदिरामध्ये घुसतांना दिसला. त्याने तोंडावर निळा सर्जिकल मास्क लावला होता. ५ फूट ९ इंच उंची असलेला हा चोर लंगडत चालत होता. पोलीस घटनास्थळी पोचेपर्यंत तो पळून गेला. यानंतर त्याने ब्रॉक रोड आणि डर्सन स्ट्रीट भागातील एका मंदिरात तोडफोड करून प्रवेश केला आणि चोरी केली. त्यानंतर त्याने अजाक्स भागातील वेस्टनी रोड साउथ येथील मंदिरात घुसून चोरी केली.

संपादकीय भूमिका 

कॅनडाच्या पोलिसांची निष्क्रीयता ! कॅनडाचे पोलीस खलिस्तान्यांवर तर कारवाई करत नाहीतच; पण चोरांनाही त्यांना पकडता येत नाही, हेच लक्षात येते !