इस्रायलच्या आक्रमणात हमासच्या वायूदलाचा कमांडर ठार

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलकडून गाझा पट्टीत हमासच्या आतंकवाद्यांवर चालू असलेल्या आक्रमणात हमासच्या वायूदलाचा कमांडर मुराद अबु मुराद ठार झाल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. हमासचे आतंकवादी जेथून हवाई कारवाया करत होते, त्याच मुख्यालयास इस्रायलने लक्ष्य केले.

सौजन्य टीव्ही 9 भारतवर्ष 

इस्रायलकडून ओलिसांच्या सुटकेसाठी  ‘सायरेत मतकल’ तुकडीला दायित्व !

हमासने शेकडो इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. ‘इस्रायलने बाँबफेक थांबवली नाही, तर ओलिसांना मारले जाईल’, असे हमासने म्हटले आहे. या धमकीनंतर इस्रायलने ओलिसांची सुटका करण्यासाठी ‘सायरेत मतकल’ या विशेष तुकडीला कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. आतंकवादविरोधी कारवाया करणार्‍यांमध्ये ही तुकडी जगातील सर्वांत धोकादायक मानली जाते. तिने आतापर्यंत अनेक कठीण कारवाया यशस्वी केल्या आहेत.