इरोड (तमिळनाडू) – इरोड जिल्ह्यातील चेन्निमलाई मुरुगन मंदिर असलेल्या पर्वताचे नामांतर ‘येसू मल्ला’ किंवा ‘कलवारी मल्ला’ असे करण्याची मागणी स्थानिक ख्रिस्त्यांनी केल्याने येथे वाद निर्माण झाला आहे. या मागणीच्या विरोधात हिंदु मुन्नानी संघटेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. ‘ख्रिस्ती संघटनाना राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे’, असा या संघटनेचा दावा आहे. नामांतराच्या मागणीच्या विरोधात हिंदूंनी पदयात्रेचे आयोजन केले आहे.
१. या पर्वतावरील मंदिराला ३ सहस्र वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. येथे भगवान श्री मृगाचे मंदिर आहे. हा परिसर हिंदूबहुल आहे; पण या परिसरात ख्रिस्त्यांकडून धर्मप्रसारासाठी अनधिकृतपणे प्रार्थनांचे आयोजन केले जाते. याला शहराबाहेरून नागरिक येतात. यामुळे येथे तणाव निर्माण होतो. या प्रार्थनांच्या वेळी भोंग्यांवरून हिंदु देवतांचा अवमान केला जातो.
२. १७ सप्टेंबरला भाजप आणि हिंदु मुनानी संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्र येत या प्रार्थनासभांना विरोध केला होता. यातून वाद होऊन धक्काबुक्कीही झाली होती. याविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. या घटनेनंतर २६ सप्टेंबरला रिव्होल्युशनरी युथ फ्रंट, विदूथलाई चिरुथाईगल कच्ची, एम्.डी.एम्.के. या संघटनांनी मोर्चा काढला होता. या मोच्यार्र्त चेन्निमलाई मुरुगन मंदिर पर्वताच्या नामांतराची मागणी करण्यात आली. यामुळे तणाव अधिकच वाढला.
संपादकीय भूमिकाहिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे ?, हे अशा घटना सतत दाखवून देत असतात, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? |