पोलिसांनी गुन्‍हा नोंदवतांना कठोर कलमे न लावल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठ संतप्‍त !

कल्‍याण येथील छत्रपती शिवरायांच्‍या पुतळ्‍याजवळ धर्मांधांनी हिरवे झेंडे फडकावल्‍याचे प्रकरण

कल्‍याण पोलिसांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

ठाणे, ३ ऑक्‍टोबर (वार्ता.) – कल्‍याण (पश्‍चिम) येथे ईदच्‍या निमित्ताने मिरवणूक काढण्‍यात आली होती. त्‍या वेळी काही धर्मांधांनी दुर्गाडी गडाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याजवळ येऊन हिरवे झेंडे फडकवत, घोषणा देत जातीय तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला. यामुळे त्‍यांच्‍यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी केली होती. घोषणा देतांनाचे चित्रीकरण सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाले होते. येथील बजरंग दल, शिवभक्‍त आणि समस्‍त हिंदू यांनी रोष व्‍यक्‍त करून बाजारपेठ पोलीस ठाणे येथे कारवाई करण्‍यासाठी निवेदन दिले होते. याची नोंद घेत बाजारपेठ पोलीस ठाणे येथे ८ – ९ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद केला आहे; पण पोलिसांनी कठोर कलमे न लावल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठ संतप्‍त झाले आहेत.

ठाणे शहर पोलीस आयुक्‍तांनी १५ सप्‍टेंबर या दिवशी त्‍यांच्‍या क्षेत्रात सार्वजनिकरित्‍या घोषणा देणे, गाणी म्‍हणणे, वाद्य वाजवणे इत्‍यादी गोष्‍टींसाठी मनाई आदेश दिला होता. (आदेश भंग करणार्‍यांवर कारवाई करण्‍यासाठी पोलिसांना हिंदुत्‍वनिष्‍ठांना निवेदन द्यावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते काय ? असे असेल, तर पोलीस प्रशासनाचा डोलारा हवाच कशाला ? – संपादक)

संपादकीय भूमिका :

  • हिंदुत्‍वनिष्‍ठांनो, संतप्‍त होऊन थांबू नका, तर संबंधित धर्मांधांवर कठोर कलमे लावण्‍यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्‍या आणि राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडा !
  • पोलीस गुन्‍ह्यानुसार गुन्‍हेगारांवर कलमे लावत नसतील, तर हे गंभीर आणि अल्‍पसंख्‍यांकधार्जिणेच !