‘भारतीय वायू सेना’दिनानिमित्त सुभेदार मेजर संजय कुमार यांचा सत्‍कार !

‘डिफेन्‍स फोर्स लीग’कडून चिंचवड (पुणे) येथे कार्यक्रम !

चिंचवड (जिल्‍हा पुणे), ३ ऑक्‍टोबर (वार्ता.) – ९१ व्‍या ‘भारतीय वायू सेना’दिना निमित्त ‘डिफेन्‍स फोर्स लीग’कडून आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात ‘परमवीर चक्र’ पुरस्‍काराने सन्‍मानित सुभेदार मेजर संजय कुमार यांचा सत्‍कार करण्‍यात आला. १ ऑक्‍टोबर या दिवशी चिंचवड येथील ‘एल्‍प्रो सिटी स्‍क्‍वेअर मॉल’ येथील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या वेळी वायूसेनेत योगदान दिलेले माजी सैनिकही उपस्‍थित होते. त्‍यांचाही या वेळी सत्‍कार करण्‍यात आला. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी सुभेदार संजय कुमार यांच्‍या जीवनावर आधारित लघुपट, तसेच पथनाट्य सादर केले.