येत्या ७ दिवसात पिकांचे पंचनामे पूर्ण करा ! – कृषीमंत्र्यांचे आदेश

मराठवाड्यात नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत काही भागांत अतीवृष्टी असून उर्वरित मराठवाड्यामध्ये पाऊस अल्प झाल्यामुळे खरीप पिकांची हानी होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळे आणि गावनिहाय पंचनामे चालू करा.

पुणे येथे रेल्वे पोलीस अधिकार्‍याच्या आडमुठेपणामुळे वैद्यकीय कक्षाची जागा पालटण्याचा खटाटोप !

रेल्वे पोलीस दलाने सुचवलेली जागा एका बाजूला असून प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर नाही. त्यामुळे ती योग्य नसल्याचे रुग्णालयाचे म्हणणे आहे.

सातारा शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक होणार ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप

ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नाही, याची उणीव भासत होती. यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून राज्यशासनाच्या वतीने या स्मारकासाठी २ कोटी रुपये निधी संमत झाला आहे

उद्ध्वस्त कुटुंबियांना ३३ घरे बांधण्यासाठी सिडकोचा पुढाकार ! – पालकमंत्री उदय सामंत

सिद्धिविनायक न्यासाच्या वतीने ५ कोटी रुपयांतून २४ घरांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित ३३ घरांच्या बांधकामासाठी सिडकोने निधी संमत केला आहे.

 २९ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

‘मेगाब्लॉक’मुळे गाड्यांच्या वेळांत होणार्‍या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी राज्य परिवहन रत्नागिरी विभाग सदैव कटीबद्ध ! – विभाग नियंत्रक पी.एस्. बोरसे

चालक अमित सुधाकर आपटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःचे व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओमध्ये प्रवासी जनतेला ‘एस्.टी.तून प्रवास करू नका. आपला जीव वाचवा’, असे आवाहन केले होते.

चीनचा ‘युतु-२’ रोव्हर ४ वर्षांनंतरही चंद्रावर सक्रीय !

प्रज्ञान रोव्हर चंद्रावर एकटा नाही. चीनचा ‘युतु-२’ नावाचा रोव्हरदेखील चंद्रावर असून तो ४ वर्षांनंतरही अद्याप सक्रीय आहे.

म. गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून अतिन दास या माजी संपादकांना अटक आणि सुटका !

म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !

प्रशासनाने दुर्गापूजेवर घातलेली बंदी कोलकाता उच्च  न्यायालयाने उठवली

उच्च न्यायालयाने दुर्गापूजेसाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी मंडप उभारण्याची अनुमती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. प्रशासन कायद्याने नाही तर दबावाखाली काम करते का कसे ?

चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर १२ मीटर चालला ‘प्रज्ञान’ रोव्हर !

रोव्हर एकूण ५०० मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत चालण्यास सक्षम आहे. आता दोन ‘पेलोड’ही (यंत्रे) सक्रीय करण्यात आले आहेत.