म. गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून अतिन दास या माजी संपादकांना अटक आणि सुटका !

काँग्रेसने केली होती तक्रार !

हैलाकांडी (आसाम) – म. गांधी यांच्यावर कथित आक्षेपार्ह टिप्पणी करण्यावरून बराक खोरे येथील एक प्रमुख बंगाली दैनिकाचे माजी संपादक अतिन दास यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती येथील पोलीस उपनिरीक्षक फारुक हुसेन यांनी दिली.

हुसेन पुढे म्हणाले की, दास यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते शमसुद्दीन बारलास्कर यांनी तक्रार प्रविष्ट केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याआधारे दास यांना कछार जिल्ह्यातील सिलचर येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली.दास यांनी १४ ऑगस्ट या दिवशी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवसा’च्या पार्श्‍वभूमीवर म. गांधी यांच्या योगदानाविषयी शंका उपस्थित केली होती, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदोउदो करणार्‍या काँग्रेसचा दुटप्पीपणा !
  • म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या ! सावरकरांचा अवमान करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध तक्रार केल्यास पोलीस त्यांच्यावर अशीच कारवाई करतील का ?