बिजिंग – भारताचे चंद्रयान-३ ‘विक्रम लँडर’सह चंद्रावर उतरले आहे. भारत चंद्रावर जाणारा चौथा, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा पहिला देश ठरला आहे. या लँडरच्या आत असलेला ‘प्रज्ञान रोव्हर’ आता बाहेर येऊन सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर धावत आहे.
प्रज्ञान रोव्हर चंद्रावर एकटा नाही. चीनचा ‘युतु-२’ नावाचा रोव्हरदेखील चंद्रावर असून तो ४ वर्षांनंतरही अद्याप सक्रीय आहे.
चीनचा ‘युतु-२’ रोव्हर अजूनही अनेक छायाचित्रे चीनला पाठवून चिनी वैज्ञानिकांना साहाय्य करत आहे. ‘युतु-२’ हा ‘रोव्हर’ ‘चांग ई-४’ यानासमवेत पाठवण्यात आले होता.