रत्नागिरी, २६ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यातील संगमेश्वर रोड ते रत्नागिरी या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी मंगळवार, २९ ऑगस्ट या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर सकाळी ७:३० ते १०:३० या कालावधीत मेगाब्लॉक (अधिक कालावधीसाठी वाहतूक थांबवणे) करण्यात येणार आहे.
यामुळे या मार्गावर धावणार्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामध्ये गाडी क्र. १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर ही गाडी २८ ऑगस्ट या दिवशी ठोकूर ते रत्नागिरी या स्थानकांच्या दरम्यान २.३० घंटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे. गाडी क्र. १६३४६ थिरूवअनंतपूरम् – लोकमान्य टिळक ही गाडी २८ ऑगस्ट या दिवशी ठोकूर ते रत्नागिरी या स्थानकांच्या दरम्यान १ घंटा नियंत्रित वेगाने चालवली जाणार आहे. या ‘मेगाब्लॉक’मुळे गाड्यांच्या वेळांत होणार्या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.