चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर १२ मीटर चालला ‘प्रज्ञान’ रोव्हर !

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘चंद्रयान-३’चा ‘विक्रम लँडर’मधील बाहेर आलेला ‘प्रज्ञान रोव्हर’ आतापर्यंत १२ मीटर चालला आहे, अशी माहिती ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ यांनी दिली. यासंदर्भातील एक व्हिडिओही ‘इस्रो’ने ‘एक्स’द्वारे (ट्विटरद्वारे) प्रसारित केला आहे.
सोमनाथ म्हणाले की, रोव्हर ठरलेल्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे.

रोव्हर एकूण ५०० मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत चालण्यास सक्षम आहे. आता दोन ‘पेलोड’ही (यंत्रे) सक्रीय करण्यात आले आहेत. हे दोघे चंद्रभूमीवरील विविध प्रकारची माहिती एकत्रित करून ‘विक्रम लँडर’कडे पाठवतील आणि लँडर ती माहिती पृथ्वीवर ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांकडे पाठवील.