पंतप्रधानांना जिवे मारण्‍याच्‍या धमकीचा ईमेल करणार्‍यावर गुन्‍हा नोंद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्‍याची धमकी देऊन देशभरात बाँबस्‍फोट करण्‍याची धमकी देणार्‍या एम्.एम्. मोखीम नावाच्‍या व्‍यक्‍तीवर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

नवी मुंबईतील अनधिकृत शाळांच्‍या संचालकांवर अद्याप गुन्‍हे नोंद नाहीत !

अनधिकृत शाळांवर कारवाई न करणार्‍या पोलीस प्रशासनाला जाब कोण विचारणार ?

वातानुकूलित लोकलगाड्यांत ४ मासांत आढळले प्रतिदिन १२६ फुकटे प्रवासी !

जुलै २०२३ मध्‍ये लोकलगाड्यांमधील विनातिकीट आणि अयोग्‍य तिकीटावर प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून १५ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे.

पणजी येथे उद्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’चे आयोजन

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करण्याच्या मागणीवरून ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या अंतर्गत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना पणजी येथे शनिवार, १२ ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ !

गोवा : मूर्तीकारांना देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करण्याची अनेक आमदारांची विधानसभेत मागणी

आमदार जीत आरोलकर यांनी त्यांचे सूत्र मांडतांना सरकारने चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या पारंपरिक मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे आणि प्रतिमूर्ती अनुदान वाढवावे, अशा मागण्या केल्या.

केंद्र सरकारच्‍या अविश्‍वासाच्‍या ठरावावरील मतदानासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या दोन्‍ही गटांकडून पक्षादेश !

लोकसभा अध्‍यक्षांच्‍या मान्‍यतेनुसार कुणाचा पक्षादेश वैध आहे ?’ हे ठरवला जाण्‍याची शक्‍यता आहे. ८ ऑगस्‍टपासून या प्रस्‍तावावर संसदेत चर्चा चालू आहे. ही लोकशाहीची थट्टाच नव्‍हे का ?

औरंगजेबाचे स्‍टेटस ठेवल्‍यामुळे सात्रळ येथील व्‍यक्‍तीवर गुन्‍हा नोंद !

शाळा आणि महाविद्यालय चालू, तसेच बंद होण्‍याच्‍या वेळी गर्दीचा अपलाभ घेऊन धर्मांध विद्यार्थिनींना छेडतात. त्‍यांना मानसिक त्रास देतात. या सर्व गोष्‍टींची नोंद स्‍थानिक नेते आणि पोलीस प्रशासन घेणार का ?

डॉ. कुरुलकर यांनी भ्रमणभाषमधील संभाषण आणि अ‍ॅप काढून टाकल्‍याचा अहवाल प्राप्‍त !

डॉ. कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्‍याचे न्‍यायालयात नमूद केले होते. कुरुलकर यांनी ब्राह्मोसच्‍या संदर्भात कोणती गोपनीय माहिती दिली आहे का ? हे पहाणे आवश्‍यक असल्‍याचे ए.टी.एस्.ने म्‍हटले आहे.

सिंधुदुर्ग : हत्तींमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांचे सावंतवाडी वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

शेवटी हत्तींना हटवण्याविषयी येत्या १५ दिवसांत मंत्रालयात वनमंत्र्यांसह बैठक घेण्याचे आश्‍वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याचे लेखी पत्र वनविभागाकडून देण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.

गोवा : अट्टल चोराला चोरीसाठी साहाय्य करणारा दक्षिण गोव्यातील पोलीस हवालदार निलंबित

रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! पोलीसच जर अट्टल गुन्हेगारांना साहाय्य करत असतील आणि त्याची पोलीस खात्यातच जर साखळी असेल, तर राज्यातील गुन्हे अल्प कसे होणार ?