कला अकादमीच्या सभागृहाचा ‘स्लॅब’ लोखंडी सळ्या गंजल्याने कोसळला : आय.आय.टी.चा अहवाल !

राज्याचे मुख्य अभियंता, आय.आय.टी. मुंबई आणि त्यानंतर आय.आय.टी. देहली यांनी दिलेल्या अहवालात ‘हे बांधकाम ४३ वर्षे जुने असल्याने लोखंडी सळ्या गंजल्यामुळे ‘स्लॅब’ कोसळला’, असे कारण दिले आहे.

भारतियांच्या ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अद्वितीयत्व !

‘सहस्रो वर्षांपासून भारतातील हिंदूंनी ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल केली, इतर देशांप्रमाणे पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापण्यासाठी प्रयत्न केले नाहीत; कारण त्यांना त्यातली निरर्थकता ज्ञात होती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्‍ह्यातील प्रशासकीय कार्यालय, तसेच पोलीस ठाणे येथे निवेदन !

शासनाने बंदी घातलेले प्‍लास्‍टिकचे ध्‍वज विक्री करणार्‍या विक्रेत्‍यांवर कारवाई करून राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे, तसेच भोर येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय, तसेच पोलीस प्रशासन यांना देण्‍यात आले.

आमदार प्रकाश सुर्वे यांच्‍या मुलावर गुन्‍हा नोंद !

दुकीच्‍या धाकावर राजकुमार सिंह या व्‍यावसायिकाचे अपहरण केल्‍याप्रकरणी सुर्वे यांच्‍यासह ५ जणांवर गुन्‍हा नोंद आहे.

खराब हवामानामुळे मुख्‍यमंत्र्यांचे हेलिकॉप्‍टर माघारी !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे १० ऑगस्‍ट या दिवशी हेलिकॉप्‍टरद्वारे सातारा येथील त्‍यांच्‍या दरे या मूळगावी जाणार होते; मात्र खराब हवामानामुळे माघारी घेऊन हेलिकॉप्‍टर मुंबई येथे तातडीने उतरावे (इमर्जन्‍सी लँडिग) लागले.

मंत्रालयात वर्षभर प्रतिदिन छत्रपतींचे स्‍मरण !

सकाळी १०.४५ वाजता २ ते ३ मिनिटांची ध्‍वनीफीत सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेच्‍या वतीने प्रसारित केली जाणार आहे.

बलात्‍कार करणारा धर्मांध चोरी करतांना पकडला !

आरोपींकडून देशी कट्टा, चाकू, जिवंत काडतुसे जप्‍त करण्‍यात आले आहेत. यांपैकी एका आरोपीवर बलात्‍कार केल्‍याचा गुन्‍हा नोंद आहे.

राणीच्‍या बागेत विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यासदौरा !

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) ९ ऑगस्‍टला प्रभादेवी येथील ‘रचना संसद अकॅडेमी ऑफ आर्किटेक्चर’ महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यास दौरा आयोजित करण्‍यात आला होता.

प्‍लास्‍टिकचे राष्‍ट्रध्‍वज विकणार्‍यांवर गुन्‍हे नोंद करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी प्‍लास्‍टिकच्‍या राष्‍ट्रध्‍वजाची सर्रासपणे विक्री करण्‍यात येते. प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर राज्‍यशासनाची बंदी आहे. त्‍याचसमवेत राष्‍ट्रध्‍वजाचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी अशा विक्रेत्‍यांवर गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत.

पुणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात तक्रार प्रविष्‍ट !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक अध्‍यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून कारवाई करण्‍यात यावी, अशी तक्रार डेक्‍कन पोलीस ठाण्‍यामध्‍ये महात्‍मा गांधी यांचे पणतूू तुषार गांधी यांनी केली आहे.