औरंगजेबाचे स्‍टेटस ठेवल्‍यामुळे सात्रळ येथील व्‍यक्‍तीवर गुन्‍हा नोंद !

राहुरी – औरंगजेबाचे स्‍टेटस ठेवून दूषित वातावरण निर्माण करण्‍याचा प्रयत्न केल्‍याने तसेच समाजामध्‍ये शत्रुत्‍व आणि द्वेषाची भावना वाढवण्‍याच्‍या उद्देशाने औरंगजेबाचे छायाचित्र, तसेच ते छायाचित्र डोक्‍यावर घेऊन नाचणार्‍या मुलांचा व्‍हिडिओ स्‍टेटसला ठेवल्‍याने अलबश्‍क शेख यांच्‍या विरोधात सात्रळ (तालुका – राहुरी) येथे गुन्‍हा नोंद केला आहे.

शाळा आणि महाविद्यालय चालू, तसेच बंद होण्‍याच्‍या वेळी कोणताही संबंध नसतांनाही धर्मांध तेथे गर्दी करतात. या गर्दीचा अपलाभ घेऊन विद्यार्थिनींना छेडतात. त्‍यांना मानसिक त्रास देतात. या सर्व गोष्‍टींची नोंद स्‍थानिक नेते आणि पोलीस प्रशासन घेणार का ? असा संतप्‍त प्रश्‍न नागरिकांनी उपस्‍थित केला आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांधांची वाढती मुजोरी !