सकल हिंदु समाजाची निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री यांच्याकडे मागणी
सातारा, २० ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील मुसलमान युवक अरमान शेख याने १५ ऑगस्ट या दिवशी इंस्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य लिखाण केले, तसेच शत्रूराष्ट्र पाकिस्तानचे उदात्तीकरण करत सामाजिक अन् जातीय तेढ निर्माण केली. अरमान शेख याच्या या दुष्कृत्याला शहरातील माजी नगरसेवक फिरोज पठाण यांनी पाठीशी घालत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘अरमान शेख आणि फिरोज पठाण यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी शहरातील सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. या प्रकरणी १५ ऑगस्टला शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली; मात्र फिरोज पठाण यांच्या दबावामुळे पोलिसांनी सौम्य कारवाई करत अरमान शेख याला सोडून दिले.
२. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक प्रसारमाध्यमांतून औरंगजेबाची छायाचित्रे ठेवणे, क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे उदात्तीकरण करणे, लव्ह जिहादला पाठिंबा देणे, हिंदु देवीदेवतांचा जाणीवपूर्वक अवमान करणे, मूर्तीभंग करणे, लँड जिहादच्या माध्यमातून खासगी आणि सरकारी जागा बळकावणे, त्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय बळाचा उपयोग करणे आदी प्रकार माजी नगरसेवक पठाण हे अल्पवयीन मुले अन् महिला यांद्वारे घडवून आणत आहेत.
३. या देशद्रोही कृत्यांद्वारे पठाण शहरातील सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवून गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घालत आहेत.
४. पठाण यांची ए.टी.एस्., सीबीआय आणि एन्.आय.ए. यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच पठाण यांचे आर्थिक व्यवहार, त्यांच्याकडे असलेले सीमकार्ड यासमवेत त्यांचे कुठल्या आतंकवादी संघटनांशी हितसंबंध आहेत का ? याचीही चौकशी व्हावी.
५. संशयित अरमान शेख याच्या आईने ‘फिरोज पठाण हा माझा भाऊ आहे. त्यामुळे माझे कुणी काही करू शकत नाही’, अशी धमकी सकल हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
६. फिरोज पठाण यांच्याविषयी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे नोंद असून अशा व्यक्तींना पोलिसांनी पाठीशी घालणे चुकीचे आहे. पठाण यांच्यासारख्या व्यक्ती समाज आणि देश यांसाठी घातक आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर असून संशयित अरमान शेख आणि माजी नगरसेवक फिरोज पठाण यांच्यावर गंभीर गुन्हे नोंद करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच या प्रकरणी आम्हाला न्याय मिळाला नाही, तर सकल हिंदु समाज देव, देश अन् धर्म रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन उत्तरदायी राहील.
संपादकीय भूमिकामहापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी आणि शत्रू राष्ट्राचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी कठोर कायदाच हवा ! |