मिरज – येणार्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि औषधे उपलब्ध न झाल्यास उपचार करण्यासाठी बिंदूदाबन लाभदायक होऊ शकते. त्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मिरज येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले. याचा लाभ अनेक शिबिरार्थींनी घेतला. सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी शिबिरार्थीना बिंदू दाबनाचे महत्त्व सांगून रुग्णाला कसे बरे करू शकतो ? हे शिबिरार्थींना शिकवले. या वेळी साधक रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले.
विशेष
शिबिराच्या समारोपाच्या सत्राच्या वेळी पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांची वंदनीय उपस्थिती होती. गुरुदेवांनी दिलेल्या या अमूल्य ज्ञानाचा उपयोग करून ते कृतज्ञता भावाने कृतीत कसे आणायचे ? याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
काही रुग्ण साधकांना आलेले अनुभव
१. सौ. मंगल खोत या गुडघ्याला पट्टा लावून आल्या होत्या. उपचारानंतर त्यांना चालता येऊ लागले.
२. सौ. शोभा कौलकर आणि कु. मोहिनी आचार्य यांना मांडी घालता येत नव्हती. उपचारानंतर त्यांना मांडी घालून बसता येऊ लागले.
३. पू. जयराम (आबा) जोशी यांना डावा पाय उचलता येत नव्हता. त्यांच्या पायाची चांगली हालचाल होऊ लागली, तर पू. सदाशिव (भाऊकाका) परब यांना जीना सहजतेने चढता येणे शक्य झाले.
ज्या रुग्ण साधकांवर उपचार केले. त्या प्रत्येकाला व्याधीमुक्त झाल्याचे अनुभवायला मिळाले.